संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- प्रियकर आणि त्याच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी संगमनेरमधील पती-पत्नी विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहित महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील लोहारे मिरपूर येथील संशयित पती-पत्नी विरोधात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व संशयित एकाच गावातील रहिवासी असून नाशिक रोड येथील बनकर मळा भागात राहणाऱ्या अर्चना प्रविण गोरे (वय 28) या विवाहीतेने शनिवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या राहणाऱ्या अर्चना प्रविण गोरे (वय 28) या विवाहीतेने शनिवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली होती.
प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप फिर्यादी भावाने केला असून पती-पत्नीच्या जाचास कंटाळून आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे.
अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.



