spot_img
spot_img

आजचा दिवस कसा जाणार तो पाहूया

मेष –

स्वत:च्या कृतीत बदल करण्याचा प्रयत्न यश देईल. धंदा वाढ होईल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.

वृषभ –

आर्थिक अडचण कमी होईल. घरात क्षुल्लक वाद होईल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील.जुनी कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन –

अडचणींवर मात कराल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मानसिक संतुलन ढळू देऊ नका. व्यापारात अनुकूल वातावरण राहील.

कर्क –

गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन ओळखी वाढतील. महिला, गृहद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या.

सिंह –

कुटुंबाशी निगडित प्रश्न सोडवता येतील. लोकांचे सहकार्य लाभेल. नवे कंत्राट मिळवता येईल. स्पर्धा जिंकाल. वादविवाद टाळावेत.

कन्या –

व्यवसायात स्थिरता जाणवेल. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांत सावधगिरी बाळगा.

तूळ –

विचारांना चालना मिळेल. कला-क्रीडा-साहित्यात प्रसिद्धी मिळेल. नवीन परिचय होईल. वाहने जपून चालवावीत.

वृश्चिक –

व्यवसायाला कलाटणी आणि प्रेमाला चालना मिळेल. आनंदाची बातमी कळेल. कोणाच्या भावना दुखावतील असे वागू नका.

धनु –

तुमच्या ध्येयाला सर्वांची मदत मिळेल. मित्रमंडळींमध्ये आनंदी वेळ जाईल. वादविवाद टाळावेत. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.

मकर –

जिद्दीने कठीण कामात यश मिळवाल. जवळच्या व्यक्तींची मर्जी पाहून मत व्यक्त करा. धंद्यात लक्ष द्या. खरेदी करताना पाकीट सांभाळा.

कुंभ –

नोकरी-व्यवसायात क्षुल्लक अडचणी येतील. कौतुकाचे बोल ऐकाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. आप्तेष्टांचा सहवास लाभेल.

मीन –

धंद्यात फायदा होईल. सावधपणे व्यवहार करा. विलंब सहन करा. घरातील माणसांना दुखवू नका. सहकार्‍यांकडून मदत मिळेल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!