राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी केसापूर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेचे उद्घाटन जिल्हा संघटक राजूनाना गायकवाड यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ शहराध्यक्ष विजय पवार मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप रमेश अमोलिक अंतोन शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
त्यावेळी केसापूर ग्रामपंचायत पटांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात होते ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा अपक्ष तळागाळातील वंचितांना दुर्बल घटकांना न्याय मिळवून गोरगरिबांचे अनेक प्रश्न सोडून अन्यायाचा प्रतिकार करणारा एकमेव पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष हा अपक्ष सर्व जाती धर्माचा पक्ष असून प्रत्येक खेड्यापाड्यात पुन्हा रिपब्लिकन शाखेचे नूतनीकरण करणार असल्याचे प्रतिपादन सुरेंद्र थोरात यांनी केले.
त्यावेळी केसापूर रिपब्लिकन पक्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष सुनील रणदिवे उपाध्यक्ष सचिन शेलार कार्याध्यक्ष राहुल रणदिवे त्यावेळी बापूसाहेब बनसोडे अमोल शेलार संजय शेलार माजी सरपंच बाबासाहेब पवार समता परिषदेचे दादासाहेब मेहत्रे विनोद पवार वामन टाकसाळ अनिल बोधक भारत रणदिवे साहेबराव मेत्रे आणि शेख साहेबराव खेमनर मुनीर शेख धर्मदास कसबे संभाजी शेलार विलास रणदिवे राजू भोसले सुरेश शेलार सागर शिरसाठ अजय भोसले विजय भोसले हर्षल रणदिवे महिला आघाडीच्या कांताबाई रणदिवे लहानुबाई भोसले लहानुबाई भोसले शकीला शेख विजया बोधक सूर्यकांत दिवे संगीता शेलार कमलबाई भोसले सुनिता वाघमारे स्वाती शालार शांता शिरसाट सिंधुबाई रणदिवे प्रीती भोसले संगीता पडघमल आशा वानखेडे जयश्री गोतीस अरुणा बनसोडे कल्पना रणदिवे बापू पाठारे ज्ञानेश्वर भोसले पप्पू झावरे सचिन शिंदे शुभम रणदिवे आकाश रणदिवे सचिन रोखे सनी गायकवाड भारत सोळशे आणि शेख तन्वीर शेख प्रणय रणदिवे गणेश पुजारी बबन जाधव गणेश भगत संजय भोसले आदी उपस्थित होते सूत्रसंचालन शाखाध्यक्ष सुनील रणदिवे यांनी केले तर आभार सचिन शेलार यांनी मानले.



