spot_img
spot_img

अतिक्रमणातील रस्ता खुला करण्याचे आ. खताळ यांचे महसूलला निर्देश हिवरगाव पावसा चंदनापुरी ढगाडीबाबा रस्त्याची आ. खताळ यांनी केली पाहणी

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-अनेक वर्षापासून अतिक्रमणित असलेला हिवरगाव पावसा चंदनापुरी ढगाडीबाबा या शिवरस्त्याची आ अमोल खताळ यांनी पाहणी केली. लवकरात लवकर हा रस्ता अतिक्रमणमुक्त करत खुला करून द्यावा. असे निर्देश महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. महिना अखेरीस हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून खुला केला जाईल असे आश्वासन नायब तहसीलदार अनुप गिरी यांनी दिले.त्यामुळे गेलीअनेक वर्षा पासून ते अतिक्रमणामध्ये असलेला रस्ता खुला होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगावपावसा चंदनापुरी मार्गे ढगाडी बाबाकडेजाणाऱ्या रस्त्यावर चंदनपुरी भागातील एका शेतकऱ्यांचे अतिक्रमण करून रस्त्यातच शेततळे करून रस्ताच बंद केला होता. त्या मुळे परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत होते. म्हणून शेतकऱ्यांनी हा रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी तात्कालीन तालुक्याचे लोकप्रति निधी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.

मात्र गेली अनेक वर्ष अतिक्रमणित असलेला रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते . त्यातच या शेतकर्यांच्या विरोधात अतिक्रमणधारक शेतकर्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.

या भागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आ अमोलखताळ यांची भेट घेत अतिक्रमणात असलेला रस्ता अतिक्रमणमुक्त करून देत जनते साठी खुला करून द्यावा.अशी मागणी केली होरी. त्या मागणीची गंभीर दखल घेत आ खताळ यांनी हिवरगाव पावसा चंदनापुरी ढगाडीबाबा जाणाऱ्या शिव रस्त्याची पाहणी करत रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा असे निर्देश महसूल विभागाचे नायब तहसील दार अनुप गिरी यांना दिले. त्यानंतर सदर च्या अतिक्रमणधारकांना नोटीसा देऊन या महिन्याच्या अखेरीस २८आणि २९ जानेवारीला हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून जनतेसाठी खुला करून देण्यात येईल. असे आश्वासन आ खताळ यांच्या समोर गिरी यांनी दिले.

यावेळी नायब तहसीलदार अनुप गिरी संगमनेर खुर्द मंडलाधिकारी आरती साठे तलाठीअर्चना वैद्य भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, अण्णासाहेब जाधव,उत्तम जाधव, चौरंगीनाथ गडाख, विकास गडाख, साईराम पावसे, चंद्रशेखर गडाख, गणेश दवंगे, गणेश पावसे, केशव दवंगे,  सोमनाथ दवंगे, शशिकांत जाधव, किरण पावसे, मच्छिंद्र गडाख, सुनील गडाख यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिवरगाव पावसा चंदनापुरी ढगाडी बाबाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्येच एका शेतकऱ्याने शेततळे करून अतिक्रमण केले होते याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माझ्याकडे तक्रारअर्ज प्राप्त झाला होता.त्यानुसार परिसरातील ग्राम स्थानच्या व महसूल विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून रस्त्यात येणारे शेततळे काढून टाकत परिसरातील जनते साठी खुला करून देण्यात यावा असे निर्देश आपण नायब तहसीलदार गिरी यांना दिले आहे .

 – आ अमोल खताळ

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!