spot_img
spot_img

श्रीरामपूरची कायदा आणि सुव्यवस्था टांगली वेशीवर न.पा.निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भविष्यात शहरात कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे प्रयत्न?

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – कधी काळी मुंबईचे पिल्लू अशी ओळख असणारे श्रीरामपूर शहर आता गुन्हेगारीचा शहर  म्हणून प्रसिद्धीला आले असून समाजविघातक शक्तींमुळे श्रीरामपूरची कायद्यावर सुव्यवस्था मोडीत निघाली आहे.

कारण शहरांमध्ये खून,मारामाऱ्या, कट्ट्यांचा वापर या गोष्टींमुळे शहरांमध्ये अराजकता पसरली आहे.पोलीस प्रशासनाच्या ढिलाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे मागील दोन-तीन वर्षाचा विचार करता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विघातक कृत्या करणाऱ्यांची संख्या वाढली असून पोलीस यंत्रणा अशा लोकांना पाय बंद घालण्यास असमर्थ ठरल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काल दुपारी शहराच्या एका भागामध्ये एकावर वार करून गोळीबाराची घटना घडल्याची चर्चा आता होत आहे चार-पाच दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना वाढ नंबर दोन मध्ये घडली होती त्याआधी शहरातील  निवडणुकीच्या काळात माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यावर  गोळीबार झाल्याची कथित चर्चा आहे या सर्व घटना पाहता श्रीरामपूर शहरामध्ये कायद्याचे राज्य राहिलेले नाही असे दिसून येते.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला खमक्या अधिकाऱ्यांची मोठी परंपरा आहे .त्यांनी एकेकाळी सर्व प्रकारचे गुंडगिरी मोडून काढली परंतु सध्या श्रीरामपूर विभागामध्ये असे पोलीस अधिकारी नसल्याने गुन्हेगारी वृत्तींचे पावत आहे पोलीस स्टेशनमध्ये दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना सन्मान मिळतो अशी जाहीर चर्चा मागील आठवड्यात एका आंदोलनाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन समोरच झाली.परंतु याचा पोलीस यंत्रणेवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही.

सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. संध्याकाळनंतर महिला घराच्या बाहेर पडू शकत नाही किंवा पडल्या तरी त्या सुरक्षित राहतील अशी खात्री राहिलेली नाही.त्यामुळे श्रीरामपूर मध्ये कायदा व सुव्यवस्था मोडीत निघाल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला व श्रीरामपूर विभागाला खमके पोलीस अधिकारी नियुक्त करावेत तसेच गुन्हेगारी वृत्तींना जो कोणी संरक्षण देत असेल त्यांचाही बंदोबस्त करण्यात यावा अशी अपेक्षा शहरातील आम जनता व्यक्त करीत आहे.

आगामी काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहेत.विधानसभा निवडणुकीमध्ये चौरंगी लढतीमध्ये काही उमेदवारांना मिळालेली मते लक्षवेधी आहेत. याच पद्धतीने नगरपालिका निवडणुकीत देखील चुरस होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे दिवशी शहरांमध्ये अनेक भागांमध्ये पैसे लुटालुटीच्या घटना घडल्याची उघड चर्चा आहे.मात्र त्याकडे कुणाची तक्रार नसल्याचे कारण देत पोलिसांनी कानाडोळा केला आहे. नगरपालिकेमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच इतर घटकही सरसावलेले असून यातूनच काही विपरीत घटना आगामी काळात शहरात घडू शकतात अशी उघड चर्चा आणि शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे राज्य शासन,जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी याबाबत तातडीने पावले उचलून श्रीरामपूर शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारे पोलीस अधिकारी नियुक्त करावेत अशी मागणी देखील जनतेतून होत आहे.

श्रीरामपुरात कॉलेजजवळ तरूणाच्या खुनाचा  प्रयत्न;गोळीबाराची ही चर्चा

श्रीरामपूर शहरातील आर बी एन बी कॉलेजजवळील गायकवाड शाळेच्या पाठीमागील कृष्णविहार परिसरात काल दि.२१ जानेवारी रोजी दुपारी शाहरुख आयुब पठाण या तरुणावर चॉपरने वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.यावेळी गोळीबार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.शाहरुखच्या डोक्यात,छातीवर, पाठीवर चॉपरने वार करण्यात आल्याचे समजते.त्याला सुरूवातीला शहरातील साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला लोणीला प्रवरा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितले.

शाहरुख आयुब पठाण हा श्रीरामपूर शहरातील वार्ड नं – १ मधील हुसेननगर भागात राहत असल्याचे समजले असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान शाहरूखच्या खूनाचा प्रयत्न कोणी केला आणि कोणत्या कारणामुळे केला? याबाबत पुढील तपास पोलिस करत आहे.

राजकीय दबावमुळे पोलीसही हतबल ?

दरम्यान याबाबत काही पोलीस अधिकारी व पोलिसांशी चर्चा केली असता राजकीय दबावामुळे या ठिकाणी मनासारखे काम करता येत नाही.आम्हाला खूप वाटते कठोर कारवाई करून गुन्हेगारीचा बिमोड करावा.परंतु राजकीय पुढार्‍यांच्या दबावापोटी कारवाई करण्यास अडथळा निर्माण होतो.राजाश्रय मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे.त्यामुळे श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये काम करणे अवघड झाले आहे असे ही मत काहींनी व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!