spot_img
spot_img

जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना ७ ते ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती

जळगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत.यात काही प्रवासी समोरून येणार्‍या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत ७ ते ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली होती.

जळगाव रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर परधाडे रेल्वे स्टेशनच्या अगोदर रेल्वेने ब्रेक दाबलं. त्यामुळे चाकाचे रुळाशी घर्षण झाले. काही प्रवासी रेल्वेच्या दरवाजात बसले होते. त्यांनी हे घर्षण पाहिले. त्यांना वाटले पुष्पक एक्स्प्रेसला आग लागली. हे प्रवाशांनी आग लागली अशी आवई उठवली त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उड्या घेतल्या. यावेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. याच रेल्वेखाली चिरडली गेली. मृत प्रवाशांचा नेमका आकडा अद्याप समोर आलेली नाही.मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे, कुठं शीर तर कुठे मृतदेह आढळून आले आहेत.

अचानक कोणीतरी ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली त्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. त्यावेळी बंगळूरू एक्सप्रेस समोरून येत होती त्याखाली प्रवासी चिरडले गेले आहेत. यामध्ये अनेक प्रवासी चिरडले गेले आहेत. ट्रेनमध्ये कोणतीही आग लागलेली नव्हती. पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक मारल्याने काही ठिणग्या उडाल्या त्यानंतर आगीची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली.

यामध्ये सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. तीन रुग्णालयात प्रवाशांना हलवण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!