spot_img
spot_img

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण

पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा  सुरू आहे. यातच आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

या दरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले. मात्र काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभेसाठी अजित पवार आणि शरद पवार आज एकत्र आले.

यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी पीएला विचारले कुठे बसायचे आहे, यावर पीएने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले.

यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!