राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- डॉ. बाळासाहेब विखे पाटिल इंट्रन्याशनल स्कुल राहाता मधे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सध्याची आपली पिढी ही इंग्रजी माध्यमातून शिकते मात्र मराठा साम्राज्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वातून बुद्धिमत्ता, व्यूहरचना, साहस, मानवतावाद दृष्टिकोन, शंभूराजांचे शौर्य यांचा परिचय आपल्या मुलांना करून द्यायला हवा म्हणूनच स्वराज्याचे गड किल्ले हा छोटासा प्रयत्न. पालकांनी आपल्या पाल्याच्या छोट्या छोट्या प्रयत्न व यशांमध्ये सहभागी होत त्यांचे मनोबल वाढवावे असे मत याप्रसंगी बोलताना सन्माननीय सौ. धनश्री विखे पाटील (अध्यक्षा, स्पेशल ऑलिंपिक भारत) यांनी व्यक्त केले.
शिर्डी साई रुरलच्या डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष वामाने डिवायए्सपी शिर्डी यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली ते म्हणाले की या मुलांना बघून मला माझे बालपण आठवले . मी पण लहान व्हावे आणि यांच्यासारखे बक्षीसे मलाही मिळावी. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात वाटचाल करावी असे आव्हान त्यांनी मुलांना केले.
नऊवार घातलेल्या मुली, मावळे,मुघल, शिवकालीन देखव्यामुळे वातावरण शिवमय झाले होते संपूर्ण परिसर शिवगर्जनेने निनादून गेला होता.
यानिमित्ताने शाळेचे प्राचार्य किशोर निर्मळ म्हणाले की मुलांना ज्ञानाबरोबरच संस्कार देणे व आपल्या संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यास योग्य बनवणे हाच आमचा ध्यास आहे त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.
याप्रसंगी चिमुरड्यांनी वेगवेगळ्या नृत्यांचे जोरदार सादरीकरण केले. यावेळी पालकांकडून मुलांचे भरभरून कौतुक होत आहे.
या निमित्ताने सौ. धनश्री विखे पाटील (अध्यक्ष स्पेशल ओलंपिक भारत) सन्माननीय श्री शिरीष वामाने (डी.वाय.एस.पी शिर्डी पोलीस स्टेशन )शिर्डी साई रुरल चे डायरेक्टर माननीय दिघे सर माननीय डॉ. ए्म. एन. खर्डे, डॉ. सोमनाथ घोलप, प्रा. दंडवते,मा. सौ. दिपाली कुऱ्हे शाळेचे प्राचार्य श्री.किशोर निर्मळ उपस्थित होते.
शाळेचे कला शिक्षक जयललित तक्ते यांनी उत्कृष्ट देखावे व सजावट केली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विषेश परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्विता गोसावी, भूमी शाह, शरयू देशमुख यांनी केले तर आभार श्री विजय गाढवे यांनी मानले.




Total Users : 624570