spot_img
spot_img

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार श्रीरामपूर मधील आरोपीवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार  श्रीरामपूरमधील स्वप्निल जैनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी स्वप्निल जैन (रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली असून, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत माहिती अशी की पीडित मुलगी (वय 17 वर्षे 8 महिने) काही कारणास्तव सोनई येथे जाण्यासाठी निघाली होती. आरोपी स्वप्निल जैन याने तिला “मी तुला सोनईला सोडतो” असे सांगून विश्वास संपादन केला आणि तिला आपल्या गाडीत बसवले. मात्र, सोनई येथे न नेता ब्राह्मणे उंबरे येथील एका लॉजवर घेऊन जाऊन तिथे तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर त्यानंतर गाडीमध्येही पीडितेवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 138/2025 नोंदवण्यात आला आहे.

आरोपीवर पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8, 12 तसेच बीएनएस 64 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. या अमानुष घटनेमुळे श्रीरामपूर शहर आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी श्रीरामपुरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!