spot_img
spot_img

देवळाली प्रवरा शहरात शिवजयंती उत्साहात

देवळाली प्रवरा( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

देवळालीतील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, पठारे स्कुल, जिल्हा परिषद शाळा यांनी सकाळी प्रभात फेरी काढून शिवरायांच्या घोषणा देऊन शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न केले.

देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांची अंत्ययात्रेसाठी होणारी नागरिकांची गैरसोय दूर करण्याकरिता देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या आज शिवजयंतीच्यादिनी स्वर्गरथाचे लोकार्पण मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब कदम, उद्योजक ऋषभ लोढा, रामेश्वर तोडमल, पत्रकार रफिक शेख, मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर ,दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल,वसुली विभाग भरत साळुंके, सारंगधर टिक्कल, कृष्णा महांकाळ, अरुण कदम,राजेंद्र कदम , अश्विनी भांगरे, अमोल पंडित,गोरख भांगरे,राजेंद्र कदम, बाळासाहेब भोंडगे , नंदू शिरसाठ , अमोल कांबळे, राजेंद्र हारगुडे, विकास गडाख, पिंटू सूर्यवंशी , निळकंठ लगे आदिंसह  कर्मचारी उपस्थित होते

लाठ्या-काठ्यांचे प्रात्यक्षिके, तलवारबाजीचे प्रदर्शन, सामाजिक संदेश देणारी नाटिका, शिवरायांचा जयघोष, लेझीमवर थिरकणारी चिमुकलयांची पावले अशा उत्साहात देवळाली प्रवरा येथील स्व. विठ्ठलराव पठारे इंग्लिश मिडीयम स्कुलच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी शिवाजी चौक मित्र मंडळ, व्यापारी संघटना व साई प्रतिष्ठान यांनी पठारे स्कुल आयोजित शिवजयंती उपक्रमाचे कौतुक करून संस्थेचे संस्थापक भागवत पठारे व संचालक ज्ञानेश्वर पठारे व प्राचार्य पल्लवी पठारे यांचा सन्मान केला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंज, कार्याध्यक्ष विश्वास पाटील, माजी नगरसेवक संदीप मुसमाडे, अनंत कदम, वंचितचे संतोष चोळके, सिद्धार्थ कांबळे, सुभाष मुथा, सनी मुथा, योगेश रहाणे, कुमार कदम आदिंसह नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय पठारे, सुरेश पठारे, भूषण कोळसे,श्रद्धा निद्रे, अंजली बेहळे, कविता पांडे, सोनाली पुंडकर, ज्योती चव्हाण, रोहिणी कोळसे, अकबर शेख, अनुराधा पवार,भास्कर भालसिंग, सुनील हिंगे, बाळासाहेब गायकवाड , हर्षदा गिरमे आदिंनी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!