spot_img
spot_img

मिल्लत नगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली, नागरिकांच्या घरात पाणी शिरले

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – येथील मिल्लत नगर भागातील साठवण तलावाकडे जाणारी मुख्य पाईपलाईन जॉईंट वर लिकेज झाल्याने पाण्याच्या प्रवाहाने आज फुटली. त्यामुळे आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरले. 

सध्या प्रवरा कालव्याला पाण्याचे रोटेशन चालू असून तलावामध्ये पाणी घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत माहिती देताना नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे निलेश बकाल यांनी सांगितले कि मिल्लत नगर पुलापासून तलावापर्यंत चार फुट व्यासाची सिमेंट पाईप लाईन आहे. पुढे ती तीन फूट करण्यात आलेली आहे.याच पाईपलाईन वर आज पाण्याच्या प्रवाहामुळे जोड लिकेज झाल्याने अनेक ठिकाणी पाणी पाईपलाईन मधून बाहेर आले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाईपलाईनच्या शेजारी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे लिकेज झालेले पाणी त्या घरांमध्ये शिरले. संपूर्ण पाईपलाईनच्या आसपास ६० ते ७० घरे असल्याने त्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती करणे सुद्धा आता अवघड झालेले आहे. तसेच पाण्याचे रोटेशन लवकरच संपणार असल्याने पाणी थांबवणे अशक्य आहे. तरी देखील पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज पाण्याचा प्रवाह कमी केला आहे. आज याबाबत दुरुस्ती करण्यात येईल.मात्र या परिसरातील नागरिकांनी आपली अतिक्रमणे जर काढली नाही तर तलावात पाणी सोडता येणार नाही म्हणून पाईपलाईन दुरुस्तीसाठी आसपासच्या नागरिकांनी आपली अतिक्रमणे ५ ते १० फुट काढून घ्यावी अन्यथा नगरपालिकेला ती काढणे भाग पडेल असा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या नगरपालिकेमार्फत अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे. मुख्य जलवाहिन्या शहरातून ज्या ज्या भागातून गेलेल्या आहेत अशा प्रमुख १५ ठिकाणची अतिक्रमणे काढण्याचे नगरपालिकेने आधीच जाहीर केलेले आहे .. मिल्लत नगर भागातील ही पाईपलाईन मुख्य असून या पाईपलाईनमुळेच साठवण तलावात पाणी साठवले जाते.सिमेंटची पाईपलाईन लिकेज झाल्याने आता पाणी बाहेर पडत आहे.त्याचा त्रास आसपासच्या नागरिकांना देखील होत आहे.तेव्हा पाईपलाईनच्या शेजारील सर्व नागरिकांनी आपली अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावी अन्यथा नगरपालिकेला ती काढणे भाग पडेल असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!