spot_img
spot_img

महाकुंभमेळ्यात आमदार अमोल खताळ पाटील यांचे त्रिवेणी संगमात अमृतस्नान

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- प्रयागराज येथे सुरू असलेल्या पवित्र महाकुंभमेळ्यात शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मंत्रीगण, आमदार, शिवसेना नेते आणि शिवसेना कार्यकर्त्यांसह संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान करून धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभूती घेतली.

गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमातील स्नान हे तमाम हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेचे केंद्र असून, यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी संगमनेर मधील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि विकासासाठी विशेष प्रार्थना केली.

महाकुंभमेळा हा भारताचा सर्वात भव्य, पवित्र आणि धार्मिक सोहळा असून, आस्था, भक्ती आणि अध्यात्म यांचे अद्वितीय प्रतीक आहे. या पुण्यस्नानानंतर आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले,

“त्रिवेणी संगमात अमृतस्नान केल्याने अपार सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीची अनुभूती झाली. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, मंत्रीगण, आमदार आणि समस्त शिवसैनिकांसोबत हा सोहळा अनुभवणं ही अभिमानास्पद बाब आहे. संगमनेर आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मी गंगामातेच्या चरणी प्रार्थना केली.”

यावेळी शिवसेना पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!