बाभळेश्वर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- दि.८ मार्च २०१५ रोजी कै.श्री. नाथाजी पाटील म्हस्के शैक्षणिक संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विद्या विकास पब्लिक स्कूल व नाथाजी पाटील म्हस्के जुनिअर कॉलेजच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमासाठी इंडियन फार्मस फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लिमिटेड च्या संचालिका सौ.कमलताई रावसाहेब म्हस्के पा.या उपस्थित होत्या त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख झाशीची राणी लक्ष्मीबाई , राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले , सरोजिनी नायडू यांनी समाजला घडविण्याचे काम केले .महिलांनी स्वत: चे आरोग्य संभाळून मुलांच्या व कुटुंबाच्या तसेच समाजाच्या उत्कर्षासाठी महत्वाचे योगदान देत आहेत. तसेच महिला आज पोलिस दल , नेव्ही , आर्मी , पायलट , शिक्षिका , इंजिनिअर , डॉक्टर , वकील , राष्ट्रपती या पदावर कार्यरत असून महिलांनी समाजात उच्च पदे मिळवली आहेत त्या स्वत: च्या पायावर उभ्या राहात आहेत. असे सांगितले
या प्रसंगी विद्या विकास पब्लिक स्कूलच्या महिला शिक्षिका यांनी कार्यक्रमाचे आकर्षक आयोजन करून विविध कार्यक्रमांनी रंगत आणली. कार्यक्रमासाठी राधिका म्हस्के , मनीषा लहामगे , नंदा नन्नावरे , शीतल विखे , माधुरी निर्मळ ,अर्चना नळे, मीनाताई म्हस्के , आर्शिया पटेल , पुनम म्हस्के , रेश्मा जायभाये , शीतल म्हस्के ,मीनाक्षी देसरडा , राजश्री म्हस्के , वैष्णवी म्हस्के, जानवी गोसावी , सोनाली बनसोडे , सोनल पटेल ,लतिका म्हस्के , अश्विनी गोरे तसेच मोठ्या संखेने महिला पालक वर्ग उपस्थित होत्या. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती चेचरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमृता सोमवंशी यांनी केले.