राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):- वृद्ध महिलेला भुरळ घालून तिच्या अंगावरचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना राहाता शहरात घडली
याबाबत माहिती अशी की साकुरी येथील एक वृद्ध महिला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे बँकेतून काढण्यासाठी ती राहाता शहरातील महावीर किराणा दुकाना समोरील सोनार गल्ली इथून पुढे जात असताना दोन अनोळखी इसम भेटले त्यांनी महिलेस सांगितले की समोर पाच पाच हजार रुपयांचे वाटप व त्यासोबत एक साडी देत आहे. तुम्ही आमच्याबरोबर चला असे म्हणून जवळच असलेल्या टायर जवळ घेऊन त्यांना टायरवर बसून ते दोन इसम महिलेच्या दोन्ही बाजूला बसले व महिंद्रा म्हणाले की ते लोक फक्त गरिबांना पैसे देतात तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने पिशवीत ठेवा व ती पिशवी मोठ्या पिशवी टाका. असे म्हणून दोन अनोळखी इसमाने महिलेचा विश्वास संपादन करून महिलेच्या गळ्यातील ५ हजार किमतीचे १ सोन्याचे डोरले अंदाजे २.५ ग्रॅम, कानातील ५ हजार किमतीचे दोन कर्णफुले वजन २.५ ग्रॅम व कानातील ५ हजार किमतीचे दोन सोन्याचे वेल अंदाजे २.५ ग्रॅम, असा एकूण २० हजार किमतीचे सोने अज्ञात इसमाने विश्वास संपादन करून चोरी केल्याची फिर्याद राहाता पोलीस स्टेशनला दिली आहे.
आरोपी विरुद्ध बी.एन.एस.कलम ३१८ (४)३१६(२),३(५) प्रमाण अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमने त्यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो,हे.कॉन्स्टेबल एम. बी. शिरसाठ, पो.ना.व्ही.टी. अभंग हे गुन्ह्याचा तपास करत आहे.