करंजी( जनता आवाज वृत्तसेवा):- जलसंपदा मंत्री पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याची मोठी संदीप महायुती सरकारच्या माध्यमातून प्राप्त झाली असून गोदावरी खोऱ्यात 65 टीएमसी पाणी आणणार असून या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार असून जिल्ह्यात तीन एमआयडीसी मंजूर झाल्या असून औद्योगिक वातावरण निर्माण करायचे आहे या एमआयडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दहा हजार भूमिपुत्रांना रोजगार दिला जाणार आहे. एमआयडीसी मधील खंडणी बहादरांचा देखील बंदोबस्त केला जाणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
नगर तालुका भाजपामहायुतीच्या वतीने रविवारी सकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहात पालकमंत्री विधान परिषदेचे सभापती व महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिकाताई राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. संग्राम जगताप, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विक्रम पाचपुते, आ. अमोल खताळ, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाबुशेठ टायरवाले, नितीन दिनकर, अभय आगरकर, अनिल शिंदे, विनायक देशमुख, अशोक सावंत, सुनील साळवे, शहाजीराजे भोसले, मार्केट कमिटीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, मार्केट कमिटीचे सर्व संचालक खरेदी वक्री संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक नगर तालुका भाजपाचे सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते शेतकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नामदार विखे पाटील यांनी जिल्ह्यातील विकास कामासाठी मोठा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नामदार विखे पाटील म्हणाले शिर्डी बेलवंडी आणि नागापूर येथे विस्तारित एमआयडीसी उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होईल यामुळे सुमारे दहा हजार तरुणा रोजगार मिळेल. मात्र सध्या एमआयडीसीमध्ये काही खंडणीबाहदर टोळ्या उद्योजकांना त्रास देत आहेत त्यांचा देखील बंदोबस्त करण्यासाठी लवकरच कठोर पावले उचलली जातील.
जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील याआधी बाहेरच्या नेत्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यावर अन्याय केला पाणी प्रश्न हा जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय असून निळवंडे कुकडी आणि साकळाई प्रकल्प रखडण्यास येथील काही नेत्यांचे सहकार्य होते. मात्र आता जलसंपदा खाते माझ्याकडे आल्याने हे प्रश्न मार्गी लागत आहेत साकळाई योजने संदर्भात टीका करणाऱ्यानाही उत्तर दिले जाईल. आमदार कर्डिले म्हणाले महायुतीचे सरकार आल्यावर अनेकांना वाटले की जेष्ठ आमदार म्हणून कर्डिले यांना मंत्रिपद मिळेल लाडक्या बहिणीमुळे मोनिकाताईंना वाटले आपल्याला संधी मिळेल परंतु आम्हाला मंत्रीपदाची संधी मिळाली नाही तरी चालेल फक्त मतदारसंघात निधी भरपूर द्या मंत्री व्हावे अशी माझी अपेक्षा नाही जर तुमच्या मनात काही आले तर अडीच वर्षाचा कार्यक्रम ठरलाय विखे पाटील फक्त तुमचा खांदा पलटू नका दक्षिण उत्तर ऐवढेच करा आमच्यात एखाद्याला मिळाले नाहीत तर कोणी नाराज होणार नाही महिला म्हणून मोनिकाताईंनाच संधी मिळेल असे वाटते आहे. याबाबत मोनिकाताई कधी कोणाला काही सांगणार नाही थेट मंत्री होऊन आल्यावरच आपल्याला समजेल अशा मिस्कील शब्दात आमदार कर्डिले यांनी मंत्री पदाबाबत भाष्य केले.
माझा पण विचार करा,,
या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले मागच्या वेळी मी आजी होतो तर स्टेजवरील अनेक जण माझी होते आता माझाही कुठेतरी विचार करा नाहीतर विरोधकांना भाषणातून ठोकून काढण्यापुरतच मला बोलवू नका अजून चार वर्षे जायचे आहेत. आजीने जेवढी विकास कामे केली नाहीत त्यापेक्षा 50 पट विकास कामे मी मार्गी लावले असून साकळाई योजनेबाबत टिंगल करणाऱ्यांना देखील या योजनेला मंजुरी देऊन तोंडघशी पाडले आहे. पदावर असो किंवा नसो जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणे हीच विखे कुटुंबाची कामाची पद्धत आहे जे बोलतो ते करून दाखवतो अशा शब्दात डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
लाडक्या बहिणीचा विचार करा,,
लाडक्या बहिणीमुळे राज्यात महायुतीचे सरकार आले आहे त्यांची प्रतिनिधी म्हणून मी एकटीच महिला आमदार जिल्ह्यात आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये होणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेवगाव पाथर्डी तालुक्यात व्हावे दक्षिणेतील सर्वच आमदार याला पाठिंबा देतील. आम्ही जागा उपलब्ध करून देऊ लाडक्या बहिणींची इच्छा सभापती पालकमंत्री आणि माजी खासदार मान्य करतील अशी अपेक्षा आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त करत विकास निधीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला पाठबळ द्या असे शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमदार कर्डिलेंनी ठराव मांडला,,
सन 2022 ला विधान परिषदेचा आमदार होण्याची संधी मला मिळाली आणि माझ्या आमदारकीचा ठराव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मांडला आणि खऱ्या अर्थाने मला आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे कर्डिले जे बोलतात ते करून दाखवतात सुजय विखे पाटील यांना खासदार करण्यासाठी आम्ही सर्वजण पाठीशी आहोत मात्र त्यासाठी काय दिवस श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागेल असे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले.



