spot_img
spot_img

साई निर्माण संकुल सन्मानाचे केंद्र-प्राचार्य गणेश डांगे प्रजासत्ताक दिन उत्साहात

शिर्डी दि २६(जनता आवाज प्रतिनिधी):- 
साई निर्माण हे एकमेव शैक्षणिक संकुल शहर व खेडे गावाच्या सीमेवरील नामांकित संकुल आहे, त्यामुळे चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पोस्टवर प्रधान झालेल्या यशवंतांचा सन्मान करण्यासाठी साई निर्माण संकुल हे केंद्रस्थान असल्याचे प्रतिपादन संकुलाचे प्राचार्य गणेश डांगे  यांनी केले . 
                 गुरुवारी शिर्डी येथील साई निर्माण संकुलात ७४ वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यावेळी ते बोलत होते .को-हाळे गावातील एमपीएससी उत्तीर्ण अंकुश डांगे हे खेडे गावाचे भूषण आहे असे ते म्हणाले  . या कार्यक्रमात साई निर्माण स्कुल, ज्युनिअर कॉलेज, सिनिअर कॉलेज, अकॅडमी, पॅरामेडिकल, पंतप्रधान कौशल्य योजना या विभागातील हजारो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. ध्वजारोहण को-हाळे येथील एमपीएससी उत्तीर्ण जवान अंकुश डांगे यांच्या हस्ते करण्यात आले . संकुलातील विद्यार्थ्यांनी यावेळी  नृत्य, डान्स, प्रजेला सत्ता मिळवण्यासाठी जवानांनी केलेल्या परिश्रमावर भाषणे  अशाप्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते .  आदर्श शिक्षक म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्राचार्य गणेश डांगे यांचा सत्कार केला, तसेच सुहास भालेराव , गोविंद शिदोडे याचाही सन्मान करण्यात आला . यावेळी महत्वाचे म्हणजे प्राचार्य गणेश डांगे व मुख्याध्यापक संदीप डांगे यांनी प्रजासत्ताक दिनाचे अचूक व व्यवस्थित नियोजन केल्यामुळे भर पावसात देखील दिन उत्साहात संपन्न झाला . यावेळी संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .  सूत्रसंचालन प्रा विनोद सोनवणे तसेच स्कुलच्या विद्यार्थ्यांनी केले . 
              यावेळी साई निर्माण संकुलाचे अध्यक्ष विजय कोते, उपाध्यक्ष ताराचंद कोते, संचालक मुन्नाभाई शहा, माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, अंकुश डांगे, संजय  गोदकर ,अनिल पारखे,  भिमराज कोळगे ,रघुनाथ सोमवंशी, आकाश चांदवडकर, रविंद्र पवार, मनिलाल पटेल,  मुन्ना सदाफळ, गणेश  सदाफळ ,अनिल बोठे, वंदनाताई कोते, भीमाबाई कोते यांच्यासह  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     साई निर्माण संकुलाचे अध्यक्ष विजय कोते                यांच्यासह ध्वजारोहण करताना मान्यवर…
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!