गुहा( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गुहा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रवींद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.
मावळते उपसरपंच रवींद्र उऱ्हे यांनी ठरल्यानुसार राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडीसाठी बुधवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अरुणाताई ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती निर्धारित वेळेत शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उषाताई चंद्रे, पुनम कोळसे रवींद्र उऱ्हे निलेश ओहोळ शकीला सय्यद रामा बर्डे उपस्थित होते. यावेळी युवा उद्योजक सुजित वाबळे यांनी रवींद्र शिंदे यांच्या निवडीचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
निवडीनंतर शिंदे यांचा सत्कार करत फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष करण्यात आला ग्रामविकास अधिकारी वाळके कर्मचारी देवराम ओहळ सुधीर ओहोळ उपस्थित होते याप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक उऱ्हे
माजी सरपंच रामनाथ उऱ्हे युवा उद्योजक प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे,रवींद्र डौले,सुनील उऱ्हे, गंगाराम चंद्रे चंद्रकांत थोरात शरद बाबळे संकेत चंद्रे मुकेश चंद्रे काका शिंदे संतोष ओहोळ राहुल उऱ्हे मनोज उऱ्हे एकनाथ शिंदे उपस्थित होते .




Total Users : 630894