spot_img
spot_img

शासकीय निवासी वसतीगृहात विद्यार्थींना बेल्टने मारहाण समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी केली तीन विद्यार्थींनवर कारवाई 

जामखेड( जनता आवाज वृत्तसेवा ):-शहरातील आरोळे वस्ती येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी वसतीगृहात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला असून वसतीगृहातीलच विद्यार्थीनांमध्ये मारहाण होत असल्याचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने आज दि 24 रोजी समाज कल्याण साहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली असून या प्रकरणी जिल्हास्तरीय चार अधिकार्‍यांची समिती नेमण्यात आली असुन आयुक्तांच्या आदेशा नुसार यातील मारहाण करणाऱ्या तीन विद्यार्थींना शाळेतुन काढुन टाकुन कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी दिली आहे.अशा घटना तालुक्यात पुन्हा घडू नयेत यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. 

शहरातील आरोळे वस्ती येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी असुन या वसतीगृहात इ ९ च्या विद्यार्थ्यांकडुन इ ८ वीच्या विद्यार्थींना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली असून व्हीडिओ व्हायरल झाल्यावर सदरील घटनेची दखल घेत जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती मार्फत चौकशी करण्यासाठी पथक वसतीगृहात दखल झाले असुन यामध्ये समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रविण कोंगटिवार यांनीही वसतीगृहाला भेट दिली.

प्रकरणी जिल्हास्तरीय चार अधिकार्‍यांची समिती नेमण्यात आली आसुन आयुक्तांच्या आदेशा नुसार यातील मारहाण करणाऱ्या तीन विद्यार्थींना शाळेतुन काढुन टाकण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी दिली आहे. आशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणा संदर्भातील अहवाल वरीष्ठांना पाठवण्यात येणार आहे आशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी दिली आहे.

या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे यांनी देखील निवेदन दिले असून त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की शासकीय वसतिगृहात आशा मारहाणीच्या घटना घडल्या याबाबत सखोल चौकशी व्हावी, घटना घडली त्यावेळी सुरक्षा रक्षक व जबाबदार कर्मचारी काय करत होते. तसेच मुलांच्या अनेक समस्यांबाबत पालकांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत.

मात्र जबाबदार कर्मचारी याची गंभीर दखल घेत नाहीत. या घटनेतील आरोपींवर कारवाई करून सदर घटनेचा जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी. निलंबन करून मुलांचे शोषण करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, उपाध्यक्ष सागर ससाणे, सुग्रीव मोरे, कार्याध्यक्ष लाला वाळके, व महासचिव भिमराव सुरवसे यांनी आंदोलन करण्याचा इशाराही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

दरम्यान यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे पांडुरंग भोसले, मनसेचे प्रदिप टापरे, गणेश काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग माने, आ. रोहित पवार यांचे स्विय सहायक अभिजीत उगमुगले, यांनी देखील या निवासी शाळा व वसतीगृहाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली या वसतीगृहात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे आरोप होत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!