श्रीरामपूर ( जनता आवाज प्रतिनिधी)- संक्रांत सणाला घातलेले सोन्याचे दागिने घरातील पर्समधून चोरून नेण्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथे घडला आहे.
याबाबत सोपान रामराव पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दि.१५ जानेवारीला संक्रांत असल्याने माझी पत्नी मंदा हिने मंगळसूत्र व इतर दागिने घातले होते. त्यानंतर दि.१६ तारखेला घरातील पर्समध्ये हे दागिने ठेवून ती पर्स कपाटाला लटकावून ठेवली होती. दि.१९ ला टाकळीभानला बाजाराला जायचे म्हणून पर्स उघडली असता त्यातील सुमारे २२ हजार रूपयांचे दागिने व रोकड कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसात भादंवि कलम ३८० प्रमाणे अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.पवार हे करीत आहे.




Total Users : 614421