spot_img
spot_img

महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम-आ. खताळ उमेद अभियानांतर्गत १६३ महिला बचत गटांना ८कोटी २१लाखांचा निधी वाटप

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील १६३ महिला बचतगटांना उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत ८ कोटी २१ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे . या माध्यमातून गावागावा तील महिलांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळाले असल्यामुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या अस ल्याचे प्रतिपादन आ. अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

संगमनेर पंचायत समिती येथे समुदाय संसाधन व्यक्तींची आढावा बैठक आणि खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूकआणि निधीचे वाटप करण्यात आले होते. या वेळी आ खताळ म्हणाले, की पूर्वी बँकां कडून बचतगटांना अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते. मात्र आता तालु क्यातील बचतगट थकबाकीमुक्त झाले असल्या मुळे २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विना तारण मिळत आहे.यासाठी सर्व बँक अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो.” शालिनी ताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा कार्यालयातर्फे मोफत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात.महिलांनी या संधींचा लाभ घ्यावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री डॉ. राधा कृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यात महिला बचतगटांसाठी मोठ्या उद्योगांचे मार्ग मोकळे करण्यात येत असून, रोजगारनिर्मितीला गती मिळणार असल्याचे आ खताळ यांनी सांगितले

“संगमनेर तालुक्यातील सर्व बचतगटांना शासकीय निधी, कर्ज व व्यवसायासाठी आवश्यक मदत देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. महिलांनी पुढाकार घ्यावा. अडचणी आल्याच तर मी आणि आमदार अमोल खताळ तुमच्यासोबत आहोत.”

– नीलम खताळ, सामाजिक कार्यकर्त्या

“उमेद अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप सुरू आहे. महिलांनी वेळेवर परतफेड केल्याने बँकांचा विश्वास मिळवला आहे. त्यामुळे आता सर्व बँका कर्ज वाटपात पुढाकार घेत आहेत.”

– राजेंद्र ठाकूर, प्रभारी गट विकास अधिकारी

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!