28.9 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

त्रिलोक परमार्थिक संस्थेच्या विश्वस्तपदी नंदकुमार भटेवरा यांची नियुक्ती

कोल्हार ( वार्ताहर ) :- जैन धर्मियांमध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या अहमदनगर येथील त्रिलोक परमार्थिक संस्थेच्या विश्वस्तपदी कोल्हार भगवतीपूर येथील नंदकुमार केवलचंद भटेवरा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. 

कोल्हार भगवतीपुर येथील जैन संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय नवी दिल्ली येथील जैन कॉन्फरन्स विहारधाम योजनेचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी पद भूषविले आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सदैव पुढाकार असतो.  

त्यांच्या निवडीबद्दल कोल्हार भगवतीपुर येथील शिवधन पतसंस्थेचे अध्यक्ष अजित मोरे, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमण कुंकूलोळ, भाजयुमोचे उपाध्यक्ष ऋषिकेश खांदे, शिवधन पतसंस्थेचे संचालक आनंद रांका, अतुल रांका, आयडीबीआय बँकेचे मॅनेजर राजेशजी क्षीरसागर आदींनी त्यांचा सत्कार केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!