24.5 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील येसगाव येथे मटका जुगार अड्ड्यांवर डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाचा छापा१९ जणांना ताब्यात ,११ लाख १९ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-कोपरगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंद्याचा अड्डा बनला होता. कोपरगावातील अनेकदा नागरिकांनी तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती. परंतु अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील येसगाव येथे मटका जुगार अड्ड्यांवर डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणा वरुन १९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तेथून ११ लाख १९ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांचा छापा पडल्याचे समजतात तेथील मुख्य सूत्रधार व इतर चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

तर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २ लाख ८४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यातील प्रमुख दोन आरोपींना विशेष पथकाने ताब्यात घेतले असून याबाबत शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!