कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील कोल्हार येथे आज झुंबरशेठ कुंकूलोळ कॉम्प्लेक्स मध्ये समता पतसंस्था कोल्हार शाखेच्या 4था वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कोल्हार शाखेमध्ये सेल्फ बँकिंग व ऑनलाईन मुदत ठेव योजनेचा शुभारंभ हभप नवनाथ महाराज म्हस्के यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी प्रस्ताविक केले. यात त्यांनी समता पतसंस्थेने वर्क फ्रॉम होम या संकल्पने प्रमाणे बँकिंग फ्रॉम होम ही बँकिंग क्षेत्रातील नवीन अभिनव संकल्पना ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक शेठ असावा व व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंगवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संजय शिंगवी यांनी आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने गावाच्या विकास कामांमध्ये समता पतसंस्थेने आपले योगदान देण्याची विनंती वजा सूचना केली. याच विनंतीचा धागा पकडून समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळात कोल्हार येथे निश्चितच भरीव योगदान देण्याचे किंबहुना कोल्हार येथील सर्व पतसंस्था मिळून गावातील पथ मार्ग अथवा चौकाचे सुशोभीकरण करून खारीचा वाटा उचलू व समाजासाठी असलेले आपले दायित्व निभावण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ महाराज म्हस्के यांनी समता पतसंस्थेने यावर्षीच्या आळंदी ते पंढरपूर या वारीमध्ये वारकऱ्यांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच पायी वारी करून थकलेल्या सर्व वारकऱ्यांचे पायांची मसाज करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले तसेच संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी समता पतसंस्थेचे व्हॉ.चेअरमन अरविंद पटेल, सीनियर ऑफिसर व्यंकटेश वैष्णव, सर व्यवस्थापक सचिन भट्टड तसेच कोल्हार येथील आबा खर्डे, अशोक असावा, दत्तात्रय राजभोज, पंढरीनाथ खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे,श्रीकांत खर्डे, विजय निबे, शिवकुमार जंगम, धनंजय दळे, श्याम गोसावी, उद्योजक श्रीकांत बेंद्रे, दीपक देडगावकर, कांतीलाल भंडारी, राजेंद्र राऊत समता पतसंस्थेचे गोल्ड लोन प्रमुख कानडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समता पतसंस्थेचे गोल्ड व्हॅल्यूवर केतन लोळगे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.