लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलच्या १६ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळवून घवघवीत यश संपादन केले.अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे यांनी दिली.
दि १८ जुलै ते २० जुलै २०२५ या कालावधीत पुणे येथील रॉयल तायक्वांदो अॅकडमी यांच्याद्वारे आयोजित केलेल्या व कै. राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडी येथे पार पडलेल्या ९ व्या राष्ट्रीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या १६ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामध्ये १ सुवर्ण, ४ रौप्य व ११ कास्य पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत अशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या सी ई ओ डॉ सुष्मिता विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त सी ई ओ डॉ शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत पाटील घोगरे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे यांनी विशेष अभिनंदन केले. शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे,उपप्राचार्य श्री के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी, क्रीडा संचालक श्री रमेश दळे व तायक्वांदो प्रशिक्षक श्री प्रदीप देशमुख व सर्व क्रीडा शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.