लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र, संस्था, लोणी अंतर्गत “लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील हायटेक प्रोजेक्ट”चे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते मंगळवार दि.२२ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता सिंधुताई विखे पाटील जॉगिंग पार्क जवळ, लोणी बाभळेश्वर रोड, लोणी खुर्द येथे होणार असल्याची माहीती संस्थेचे कृषि संचालक प्रा. डाॅ.उत्तमराव कदम यांनी दिली.
या कार्यक्रमास माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. डॉ. कदम यांनी केले आहे
.