spot_img
spot_img

आभाळ फाटलं, बळीराजा संकटात; ओला दुष्काळ जाहीर करा – आ. हेमंत ओगले श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघात ढगफुटी सदृश्य पाऊस

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- बळीराजा चहूबाजूंनी अडचणीत सापडला असून तुटपुंजी मदत देऊन काहीही होणार नसून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे. 

काल रात्रभर श्रीरामपूर- राहुरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून आमदार हेमंत ओगले यांनी सकाळीच विविध गावांना भेटी देऊन आढावा घेतला आहे. तसेच झालेल्या 100% नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहे काही ठिकाणीं असून तात्या घरांचे देखील पडझड झाली असून त्याची देखील पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत जवळपास सगळीकडेच १०० मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस पडला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले त्यामध्ये सरला याठिकाणी पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या पंधरा लोकांना बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

यावेळी आमदार ओगले म्हणाले की, या अस्मानी संकटात आम्ही सगळे मायबाप शेतकऱ्यांच्या सोबत आहोत सरकारने देखील कुठल्याही नियमांचे आडकाठी न आणता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करणे आवश्यक आहे. पुढील दोन ते तीन दिवस आणखी धोक्याचे असून हवामान खात्याने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. संबंधित शासकीय यंत्रणेला देखील आपण सूचित केले असून कोणीही मुख्यालय सोडू नये आश्या सुचना दिल्या असल्याचे सांगीतले.

याबाबत कोणतीही अडचण आल्यास मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपस्थित होते.

आ. ओगले यांनी निमगाव खैरी, गोंडेगाव, माळेवाडी,सराला, ब्राम्हणगाव भांड, चांदेगाव, बेलापूर बु. सातभाई वस्ती या ठिकाणी भेटी देत नुकसानीची पाहणी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!