spot_img
spot_img

नैसर्गिक संकटात “प्रवरा पॅटर्नचा” नागरीकांना मिळाला दिलासा जनसेवात आपत्कालीन कक्ष सुरू

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रवरा परीवार मदतीला धावून गेल्याने भयभीत झालेल्या नागरीकांना संकटातही मोठा दिलासा मिळाला.

तालुक्यात एका दिवसात २००मिमि पेक्षा जादा पाऊस झाला.शनिवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळ पर्यत सुरू राहील्याने पूर परीस्थिती निर्माण झाली.रात्री उशिरा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर्व शासकीय अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला उपाय योजनेच्या सूचना दिल्या.

रात्री उशिरा विविध गावातील लोकांना स्थलांरीत करण्याची वेळ आली मंत्री विखे पाटील यांनी सर्व लोकांना स्थानिक नागरीक आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.रविवारी तालुक्यात प्रवरा परीवाराच्या वतीने नागरीकांना फुड पॅकेटस् तसेच काही गावंमध्ये जेवणाची व्यवस्था प्रवरा परीवाराने करून मोठा दिलासा आहे

अनेक गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने काही ठिकाणी जेसीबी पाठवून पाण्याचे प्रवाह मार्गस्थ करून देण्यासाठी कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे अधिक बिकट होणारी परीस्थिती अटोक्यात येण्यास मोठी मदत झाली.

नैसर्गिक संकटाची तीव्रता लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला असून दिवसभरात काही गावामधून आलेल्या समस्या नागरीकांनी संपर्क क्रमांकावर कळवल्यामुळे जनसेवा कार्यालय आणि प्रशासनाच्या सहकार्याने नागरीकांना मदत करणे अधिक सोपे झाले.चोवीस तास सुरू रहाणार आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवसभरातील सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करून कोल्हार हनुमंत गाव पाथरे या भागात अतिवृष्टीने नूकसान झालेल्या भागाची पाहाणी केली.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील यांनी लोणी येथील अतिवृष्टीने नूकसान झालेल्या परीसराला भेटी देवून ग्रामस्थ शेतकरी यांना दिलासा दिला.

रात्री उशिरापर्यत मंत्री विखे पाटील यांनी राहाता शहरातील पूर परीस्थितीची पाहाणी केली.शहारातील स्थलांरीत करण्यात नागरीकांना भेटून दिलासा दिला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!