श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती संदर्भात आज डॉ. सुजय विखे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्ठमंडळासह मा. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी भेट घेतली.
या भेटीमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोनच दिवसापूर्वी अनुराधाताई आदिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ( अजित पवार) उमेदवारी लढविण्याचे संकेत दिले होते.
यानंतर काँग्रेसचे एक माजी नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा झडत होती. त्यांना नगराध्यक्ष पद व जिल्हा बँकेचे चेअरमन अशी ऑफर असल्याची चर्चा होती. ही चर्चा वेगाने झडत असताना काल सायंकाळी अनुराधाताई आदिक यांनी सुजय विखे पाटील यांची अचानक भेट घेतली. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. श्रीरामपुरातील राजकारणामध्ये उलथापालथ होताना दिसत आहे.



