spot_img
spot_img

दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली( जनता आवाज वृत्तसेवा):- दिल्लीतील  लाल किल्ला  मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट  झाला. या घटनेत 9 जणांचा मृत्यू  झाला असुन तर 15 जण जखमी  झाल्याचे समजते. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यानंतर मुंबई , पुण्यासह  देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याचं काही जणांना वाटलं. पण त्यानंतर हा स्फोट  गंभीर असल्याचं समोर आलं. ज्या ठिकाणी हा स्फोट  झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून  फक्त 800 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला. या ठिकाणी अग्नीशमन दल पोहोचलं असून लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसेच या ठिकाणी एनएसजीचे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत. त्याचसोबत फॉरेन्सिक टीमही या ठिकाणी दाखल झाली असून ते पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत.

दिल्लीतील या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशात इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आह.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!