spot_img
spot_img

विवेक कोल्हे विधान परिषदेसाठी भाजपकडून फायनल दैनिक जनता आवाजाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला प्रज्ञा सातवांसह उमेदवारांची घोषणा विवेक कोल्हे यांना बर्थडे गिफ्ट

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) : –आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची अधिकृत घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत अहिल्यानगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह प्रज्ञा सातव यांची नावे अंतिम करण्यात आली असून, या निर्णयाने स्थानिक तसेच राज्य पातळीवरील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीच्या मंजुरीनंतर पाच मुख्य जागांसाठी आणि एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. या यादीत संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या नेत्यांना प्राधान्य देत प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येतो.

दरम्यान, दैनिक जनता आवाजने शनिवारी ‘शब्द पाळणार का’? भाजपच्या यादीत विवेक कोल्हे यांचे नाव चर्चेत या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे दैनिक जनता आवाजचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावच्या कोल्हे घराण्याचे वारसदार असलेले विवेक कोल्हे यांना विधान परिषदेत संधी देण्याचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र असलेल्या कोल्हे यांनी गेल्या काही काळात संघटनात्मक पातळीवर सक्रिय भूमिका बजावली आहे. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या राजकीय वारशाला पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर येणार आहे.

दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांना त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षांतरानंतर तातडीने मिळालेल्या संधीची चर्चा रंगली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या इतर नावांमध्ये प्रमोद जठार (सिंधुदुर्ग), संजय भेंडे (नागपूर), माधवी नाईक आणि सुनील कर्जतकर यांचा समावेश आहे. कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही भागांमध्ये पक्षाची पकड अधिक बळकट करण्याची रणनीती या निवडींमधून स्पष्ट होते.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल असून १२ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपने वेळेआधी उमेदवार जाहीर करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे.

महायुतीतील इतर घटक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होण्याची प्रतीक्षा असून, त्यानंतर निवडणुकीतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!