spot_img
spot_img

श्रीरामपुरात गोळीबारात तरुण गंभीर जखमी

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- आज दुपारी सुमारे एक वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील  पूर्णवाद नगरमध्ये  गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारामध्ये कल्लू यादव नामक व्यक्ती जखमी झाल्याचे चर्चा आहे.

सदर व्यक्तीवर साखर कामगार हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून  पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे   नेण्यात आले आहे.

मागील काही महिन्यापूर्वी  झालेल्या वादातून  हा वाद पुन्हा उफाळला आहे. गोळीबार झाल्याची घटना  पोलिसांना समजतात घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे शहरामध्ये दहशतीचे  वातावरण आहे  . नुकत्याच  झालेल्या नगर  परिषदेच्या  निवडणुकीत उभ्या असलेल्या  उमेदवाराचा गोळीबारात जखमी झालेला  व्यक्ती हा पुतण्या असल्याची चर्चा आहे. शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडालेला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!