spot_img
spot_img

धोकादायक केबलला नगरपंचायत प्रशासनाचे अभय राजकीय संघर्षाच्या आड प्रशासन बेफाम; ‘लेखी तक्रार द्या’ची ढाल, नागरिकांचा संताप शिगेला

नेवासा(जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा नगरपंचायतीत सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा सर्वाधिक फायदा जर कोणाला झाला असेल, तर तो काही अधिकाऱ्यांना झाल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. लोकप्रतिनिधी आपापसातील राजकीय संघर्षात अडकलेले असताना प्रशासनातील काही अधिकारी मात्र कोणाच्याही नियंत्रणाशिवाय मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांची कामे वेळेत न करणे, प्रत्येक तक्रारीवर “लेखी अर्ज द्या” अशी अट घालणे, नियमांच्या नावाखाली वेळकाढूपणा करणे आणि स्वतःहून कारवाई करण्याऐवजी जबाबदारी झटकण्याची भूमिका घेणे, यामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासन म्हणजे जनतेच्या सेवेसाठी असलेली यंत्रणा. मात्र नेवासा नगरपंचायतीत सध्या नागरिकांना सेवा मिळण्याऐवजी नियमांचे धडे दिले जात असल्याचे चित्र आहे. एखाद्या नागरिकाने तोंडी तक्रार केली किंवा एखाद्या बेकायदेशीर प्रकाराची माहिती दिली तरी “लेखी तक्रार द्या, मग कारवाई करू,” हेच ठरलेले उत्तर दिले जात असल्याची चर्चा आहे.

पुढील बातमी सविस्तर उद्याच्या दैनिक जनता आवाजच्या   अंकामध्ये वाचा

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!