संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याच्या झालेल्या निर्णयाचे आ.अमोल खताळ यांनी स्वागत केले असून,महायुती सरकारने दुष्काळी भागातील जनतेला दिलेल्या आश्वानाची पूर्तता केली असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.
भोजापूर पूर चारीद्वारे तालुक्यातील अवर्षण प्रवर्षण भागातील जलसाठे भरून देण्याच्या निर्णयामुळे ३५ पाझर तलाव भरले जाणार असून, असल्याने लाभक्षेत्रातील ६०६.६३ हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार असल्याचे सांगून आ.अमोल खताळ म्हणाले की,जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यामातून भोजापूर लाभक्षेत्रातील गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील भोजापूर मध्यम प्रकल्प हा संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाकरीता वरदान ठरणारा प्रकल्प आहे. मात्र वर्षानुवर्ष चारीच्या कामाबाबत फक्त आश्वासन मिळाली.चाळीस वर्षे फक्त भोजापूर चारीच्या प्रश्नावर राजकारण करून यापुर्वीच्या सताधार्यांनी फक्त लाभक्षेत्रातील शेतकर्यांची दिशाभूल केली.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर जलसंपदा विभागाची जबाबदारी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आली.भोजापूर चारीच्या कामाला निधीची उपलब्धता त्यांनी करून दिली.आता प्रकल्पाचा समावेश सुध्दा नदीजोड प्रकल्पात करण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय लाभक्षेत्राला दिलासा देणारा ठरणार असल्याचे आ.अमोल खताळ म्हणाले.
प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिली होती तो शब्द या निर्णयाने पूर्ण केल्याबद्दल आ.अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजिदादा पवार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत.




Total Users : 627558