मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्यांना व्हायरल इन्फेक्शन, तीव्र डिहायड्रेशन आणि मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाल्याने तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे राळेगण सिद्धी येथून मुंबईत आणले गेले. सध्या डॉ. गौतम भन्साळी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून विविध चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपचारांची दिशा स्पष्ट होणार आहे.
सन २०११ मधील ऐतिहासिक ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हजारे यांनी गेल्या महिन्यातच राळेगण सिद्धी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना तरुणांना प्रामाणिकपणे राष्ट्रसेवेत योगदान देण्याचे आवाहन केले होते.




Total Users : 627203