संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- कायम सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून आमदार अमोल खताळ यांची ओळख आहे. मंत्रालयातील विविध कामांच्या निमित्ताने ते मुंबईत असताना त्याठिकाणीही याची प्रचिती आली. गेल्या अनेक वर्षांपासून मूळचे संगमनेरचे असलेले टॅक्सीचालक महेश चकोर मुंबईत आपली टॅक्सी चालवतात. त्यांच्या आग्रहास्तव आमदार अमोल खताळ यांनी टॅक्सीने प्रवास करत त्यांच्याशी संवाद साधला.
टॅक्सीचालक महेश चकोर यांच्याशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या कुटुंब, व्यवसाय तसेच मुंबईतील जीवनमानाची आस्थेने विचारपूस केली. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरातील त्यांचे अनुभव आमदार खताळ यांनी जाणून घेतले. तसेच यावेळी त्यांनी आपल्या गावापासून दूर कष्टाने व्यवसाय करणाऱ्या संगमनेरच्या भूमिपुत्रासोबत मुंबईतील प्रवासाचा टॅक्सीतून आनंद घेतला.
कामांच्या व्यापातही सर्वसामान्य माणसांशी जोडलेली नाळ आमदार खताळ यांनी तुटू दिली नाही. पदाची कोणतीही प्रतिष्ठा आड न येऊ देता सामान्य माणसांशी आपुलकीने संवाद साधण्याचा त्यांचा स्वभाव या प्रसंगातून पुन्हा एकदा दिसून आला.




Total Users : 682547