राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील मातंग समाजाप्रती तळमळ असणारे व त्यात जोमाने मातंग समाजासह उपेक्षित घटकातील समाजासाठी आपली बाजी पणाला लावून उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी व वाहतूक क्षेत्रामध्ये जे काम करणारे चालक-मालक यांच्या हाकेला लगेच धावून जाणारे मातंग समाजाचे श्री बाबासाहेब निवृत्ती आढागळे यांची सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वाहतुक जिल्हाअध्यक्ष म्हणुन संघटनेत नियुक्ती करण्यात आली यामध्ये सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे राज्य प्रवक्ते निलेश मच्छिंद्र जगधने व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल भाऊ जगधने यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री बाबासाहेब निवृत्ती आढागळे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित येथील पप्पू रमेश आढागळे विनायक वामन भिसे नितीन शहादेव आढागळे बबन दिनकर रोकडे नितीन साहेबराव भिसे अंकुश बुद्धाजी आडगळे अरुण भगवान शेख राजेश रमेश आडगळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते