spot_img
spot_img

श्रीरामपूर येथे प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दे अशी मागणी करून सासरच्यां नवविवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर  शहरातील एका सरकारी नोकरदार महिलेकडे लग्नानंतर चार-पाच दिवसांनी तुझ्या नावावरील प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दे अशी मागणी करून सासरच्यांनी शारीरिक, मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मथुरा विनोद वेताळ (वय 35, धंदा सरकारी नोकरी) त्यांचा 14 जुलै 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील साळेगाव येथील विनोद साईनाथ वेताळ याच्याशी विवाह झाला. विवाह नंतर चौथ्या पाचव्या दिवशीच मथुरा वेताळ या जेवण करत असताना विनोद वेताळने यांच्याकडे तुझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी, तुझे बँकेचे एटीएम आणि पैसे आमच्या नावावर करून दे असे म्हणाला नोकरी स्वबळावर मिळवली असल्याचे सांगत मथुरा वेताळ यांनी त्यास नकार दिल्याने विनोद ने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या सासर्‍यानेही हिला जेवन देऊ नका, असे सांगत उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर मथुरा वेताळ या श्रीरामपूर येथे असताना विनोद वेताळचा चुलत भाऊ सुभाष गंगाधर वेताळ, सुधाकर वेताळ यांनी फोनवरून धमकी दिली. विनोद वेताळचा गुरु मामा रत्नाकर शेजुळ, मेहुना रवी साळू आप्पा गवळी यांनी मथुरा यांच्या श्रीरामपूर येथील घरी येऊन त्यांना घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. तुझ्यावर खोट्या केसेस करू, तुझी नोकरी घालू, संपूर्ण कुटुंबाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात मथुरा वेताळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद साईनाथ वेताळ, साईनाथ बाजीराव वेताळ, सुभाष गंगाधर वेताळ, सुधाकर वेताळ (चौघे रा- साळेगाव, तालुका-कन्नड), रत्नाकर शेजुळ (रा- पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर), रवी साळू आप्पा गवळी (रा-खुलताबाद) यांच्याविरुद्ध भादवी कलम 323, 452, 498अ, 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!