spot_img
spot_img

जिल्हा अध्यक्षसह स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या २५ ते ३० कार्यकर्तेवर गुन्हे दाखल 

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी काल दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. जमावबंदी आदेश असताना रहदारीस अडथळा निर्माण करून आंदोलन करणारे रवींद्र मोरे यांच्या सह २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारले. सरकारच्या या धोरणा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली काल दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समिती समोर नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही. असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने अखेर बळाचा वापर करुन आंदोलन कर्त्यांची धरपकड करुन ताब्यात घेतले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, रहदारीस अडथळा निर्माण करून जन सामान्यांची गैरसोय करणे, पोलिस प्रशासनाची परवानगी न घेता लाऊड स्पीकर लाऊन आंदोलन करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या सुचनांचे उल्लंघन केले. असा आरोप करून आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले.

पोलिस नाईक दादासाहेब रोहकले यांच्या फिर्यादीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र बापुसाहेब मोरे, प्रहार संघटनेचे आप्पासाहेब भिमराज ढुस, रा. देवळाली प्रवरा, बाळासाहेब सोमा जाधव, रा. टाकळिमियाँ, जुगल गोसावी, रा. टाकळिमियाँ, विष्णु नानासाहेब मुसमाडे, रा. देवळाली प्रवरा, दिपक तनपुरे, प्रकाश बाबासाहेब देठे, रा. खुडसरगाव, ता. राहुरी, विजय उर्फ पिंटुनाना साळवे, रा. राहुरी. या आठ जणांसह सुमारे २५ ते ३० जणांवर भादंवि कलम १४३, ३४१, १८८ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३), ३३ (एन) १३१, १३५ नूसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सबंध नसणाऱ्या नागरिकांना वेठीस धरणाऱ्या आंदोलकांबाबत सहानुभूती नाही. ४० मिनीटे विद्यार्थी, पेशंट ॲम्बुलन्स, अबाल वृध्द, महीला, प्रवाशी यांना मनस्ताप सहन करावा लागला 

महामार्ग ठप्प करणाऱ्याना कायद्याचा दणका . . कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

धनंजय अ.जाधव (पोलीस निरीक्षक).पो. ठाणे राहुरी.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!