spot_img
spot_img

वैभव टेके हा तरुण वाघोलीतून बेपत्ता; वाघोली पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद !

कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा)​ : – पुणे -वाघोली परिसरातील गुलमोहर सोसायटी सिटी येथून एक २३ वर्षीय तरुण कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग (बेपत्ता) रजिष्टरमध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव अण्णासाहेब टेके (वय २३ वर्षे, मूळचा रा. वारी ता. कोपरगाव जि.अहिल्यानगर) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांची बहीण विद्या अण्णासाहेब टेके (वय २४ वर्षे, नोकरीनिमित्त रा. संतोष सातव यांच्याकडे भाड्याने, गुलमोहर सोसायटी सिटी, लेन नं. ७, दुसरा मजला, वाघोली, पुणे) यांनी या संदर्भात वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

​वैभव टेके हा २२ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनंतरच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला आहे. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा काही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.

या तक्रारीवरून वाघोली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे यांनी २३ जून २०२६ रोजी मिसिंग रजिष्टर क्रमांक ११०/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान या तरुणाबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने वाघोली पोलीस ठाण्याशी किंवा ८०८०२८२०९३ / ९८५०५६२२६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!