श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):– श्रीरामपूर शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा महाविद्यालयासह चौक व इतर ठिकाणी सीसीटीव्ही लावण्या संदर्भात आढावा घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज दिले.
पालिकेच्या सभागृहात खासदार लोखंडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे शिंदे गडाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवकर रामपाल पांडे शुभम वाघ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राहुल मुथा भाजपचे प्रकार चित्ते सुनील मुथा आदींसह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील विविध प्रश्नांचा संदर्भात सूचना घेत असताना शहरातील उघड्यावर होणाऱ्या मास व मच्छी विक्री कडे उपस्थित त्यांनी लक्ष वेधले असता लोखंडे यांनी मुख्याधिकारी शिंदे यांना संबंधितांना जाब विचारून पालिकेच्या बंद पडलेल्या मटन मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात कारवाई करावी तसेच कालव्या नजीक असलेल्या वराह अनाधिकृत वराह पैदास केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र हा प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अतिरिक्त असल्याचा खुलासा शिंदे यांनी केला त्यानंतर तात्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचरणे करण्यात आले ते आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उत्तरे देत ही जागा पलीकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले मात्र पालिकेने घरकुलाचीच जागा हस्तांतरित केलेली आहे मात्र कालव्या नजीक पाटबंधारे कडे असलेल्या जागेवर परा पैदास केंद्रे सुरू आहेत या संदर्भात पालिकेने नोटीस दिली असून पाटबंधारे विभागाने योग्य ती कारवाई करण्याचे सुचविणे त्यानंतर लोखंडे यांनी पाटबंधारे पोलीस व पालिका अशा तिन्ही विभागांनी एकत्रित कारवाई करण्याचे आदेश दिले.
खासदार निधी मधून पालिका हद्दीत लेसर शो ची उभारणी करावयाची आहे यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल असे लोखंडे यांनी सांगितले त्या संदर्भात योग्य जागा निवडून प्रस्ताव सादर करण्याचे सूचना मुख्याधिकारी शिंदे यांना त्यांनी दिल्या तसेच शहरात वरदळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यांवर शाळा महाविद्यालयात परिसरात सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात आढावा घेऊन त्याचा प्रस्ताव सादर करावा याच्या सूचनाही दिल्या.



