3.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

विखे पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा- डॉ.दिघे  महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट केंद्र हा पुरस्कार

लोणी दि.८ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली याचे कारण म्हणजे महाविद्यालयाला नुकताचमहाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट केंद्र हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराबरोबरच रुपये एक लाखाचा धनादेश सन्मानचिन्ह महाविद्यालयास प्रदान करण्यात आले हा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी स्वीकारला. शासनाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा यासाठी हा पुरस्कार महाविद्यालयास मोलाचा ठरणार आहे अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.

महाविद्यालयाच्या या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळांने महाविद्यालयाचे कौतुक केले आहे.

महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागातील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय हे नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी इतर महाविद्यालयांसाठी एक प्रेरणास्रोत ठरले आहे याची पावती या पुरस्काराच्या रूपाने मिळालेली आहे. अशी भावना सर्व सहकारी प्राध्यापकांनी व्यक्त केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!