सोनई( जनता आवाज वृत्तसेवा ):- सोनई कांगोणी या मधल्या रस्त्याचे काम चालू असताना सदर ठेकेदाराने मुरूम टाकायच्या ऐवजी माती मिश्रित मुरूम टाकल्याने रस्त्यावर प्रंचड गाळ झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.यामुळे अनेक शाळकरी मुले मुली तसेच परिसरातील शेतकरी यांचे अपघात होत आहेत.तरी प्रशासनाने तात्काळ याकामाची चौकशी करून कामाचा दर्जा सुधारण्याबाबत ठेकेदाराला समज देण्यात यावी किंवा याबाबत कांगोणी परिसरातील नागरिक आंदोलन करण्याचा तयारीत आहेत.
याबाबत सविस्तर असे कि सध्या सोनई कांगोणी रस्त्याचे काम सुरू आहे.सोनई कांगोणी रस्ता गेले कित्येक वर्ष झालेला नव्हता.परिरातील नागरिक रस्त्याच्या समस्याने आधीच परेशान झाले होते.यातच जे सध्या काम सुरू आहे हे अंत्यत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.सध्या या रस्त्यावर माती मिश्रित मुरूम टाकल्याने परिसरातील नागरिक गाडीवरून पडत आहेत.गाड्यामध्ये मातीची पेंड गुंतल्याने गाडया फसत आहेत.या कामाची क्वालिटी नसल्याने हाल होत आहे.परिसरातील विघार्थी शाळेत जाण्यास तयार नाहीत.यामुळे कांगोणी रस्तावरील नागरिक आंदोलनाच्या पाविञ्यात आहेत.प्रशासनाने ठेकेदाराला लवकरात लवकर समज देऊन कामाचा दर्जा सुधारावा नाहीतर सदर कामाची चौकशी लावण्यासाठी परिसरातील नागरिक मोठया प्रमाणावर तक्रारी दाखल करून आंदोलन करतील अशा इशारा कांगोणी रस्ता परिसरातील नागरिक प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.



