श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- बेलापूर – उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नईम पठाण यांच्या बंगल्यावर रात्री दरोडा पडला असुन दरोडेखोरांनी खिडकीला असणाऱ्या पडद्याने गळा आवळून नईम पठाण याचा खुन केला असुन त्यांची पत्नी बुशराबी पठाण या गंभीर जखमी आहेत.
या बाबत समजलेली हकीकत अशी की नईम पठाण हे व्यवसायीक असुन एकलहरे शिवारात बेलापुर उक्कलगाव रस्त्यालगतच त्यांचा बंगला आहे .त्या बंगल्यात नईम त्याची पत्नी बुशराबी हे दोन मुलासह रहात होते रात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान चार दरोडेखोर पाठीमागील दरवाजातुन घरात शिरले त्यात एक महीलाही होती त्या वेळी नईम पठाण याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी खिडकीला असणाऱ्या परद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला त्यातच त्याचा मृत्यू झाला .पत्नी बुशराबी हीलाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली त्याही गंभीर जखमी झाल्या घरातील पाच ते सहा लाख रुपयाची रोकड घेवुन दरोडेखोर पसार झाले .बुशराबी पठाण या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी वडील अनवर जहागीरदार यांना फोन करुन घटनेची माहीती दिली.
एकलहरे गावचे सरपंच रीजवाना अनिस जहागीरदार यांचे पती अनिस जहागीरदार व अनवर जहागीरदार हे तातडीने घटनास्थळी आले त्या वेळी नईम पठाण वय ४० वर्ष हा मयत झालेला आढळला तसेच बुशराबी यां गंभीर जखमी झालेल्या होत्या त्यांना तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे हलविण्यात आले अनिस जहागीरदार यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश देवुन सर्वांना जागृक केले या बाबत बेलापुर पोलीसांना माहीती समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीकारी बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे पी एस आय सुरेखा देवरे मँडम हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाली अहमदनगर गुन्हा अन्वेषणची टीम देखील गावात दाखल झाली ठसे तज्ञ तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते श्वान बंगल्याभोवतीच घुटमळले बेलापुर उक्कलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे असल्यामुळे आरोपी लवकर हाती लागण्याची दाट शक्यता असुन घटनेच्या कालावधीत एक स्वीप्ट कार या रस्त्याने गेल्याचे आढळून आले असुन अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीकारी बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत दरोडेखोरांनी नईम पठाण यांचा गळा आवळून खून केल्यामुळे पोलीसही चक्रावुन गेले आहेत हा दरोडा आहे की अन्य काही या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे