नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याss..’ चा जयघोष करीत नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या दैवत असलेल्या उत्साहात सवाद्य मिरवणूकिने भावपूर्ण निरोप दिला. मिरवणुकीत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. गणेशोत्सवाचे आयोजन एमएस्सीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केले होते.
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात श्रींची प्रतिष्ठापना प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य डॉ. अरुण घनवट, कनिष्ठ विभागाचे प्राचार्य उपप्रचार्य डॉ. दशरथ आयनर यांच्या हस्ते क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सुनील गर्जे, यश संवाद चे प्रा. देविदास साळुंके, प्रा. दिनकर आवारे यांच्या उपस्थित करण्यात आली होती. आज सोमवारी सातव्या दिवशी महाविद्यालयाच्या आवारात भव्य गणेश विसर्जन मिरवणूकिने गणपती विसर्जन करण्यात आले. दरम्यान डॉ. अरुण घनवट, प्रा. सुनील गर्जे यांच्या नेतृत्वाखाली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.
गणेशोत्सव दरम्यान सामाजिक उपक्रम व विसर्जन मिरवणुक यशस्वीसाठी प्रा. दिनकर आवारे, प्रा. किरण वैद्य, प्रा. विशाल परदेशी, प्रा. प्रवीण खोमणे, कृष्णा भणगे, प्रा. आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभागाचे रोहित मोटे, प्रितेश भूमकर, रवींद्र मोटे, घनश्याम गोरे, शुभम जाधव राहुल दारकुंडे, शुभम मुळे, सागर उंदरे शिरोमणी उगले शुभम पटारे, राहुल कोकणे, दादासाहेब राऊत, ऋषिकेश शिंदे, मयूर ताके, सीमा मरगळ, ऋतुजा कदम, कोमल गंगुले, उत्कर्ष लबडे, ईशा नागे, सोनाली ठोंबळ, सोनाली कोलते, शरयू शिंदे, मनीषा बनगये, तेजस शेळके, पल्लवी आगळे या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यांनी प्रयत्न केले.
विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा दरम्यान, गणेशोत्सव काळात एम. एस्सी शाखेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण, बेटी बचाओ… बेटी पढाओ.. जनजगृती पोस्टर स्पर्धा, यासह विविध क्रीडा स्पर्धांचे राबवले.