7 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

spot_img
spot_img

संकटात खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी उभे राहिले ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी- खा. डॉ. सुजय विखे पाटील

शेवगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):-कोरोना सारख्या संकट काळामध्ये तसेच येणाऱ्या प्रत्येक संकटांमध्ये घरातलीच एक व्यक्ती म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सर्वांच्या खंबीरपणाने पाठीशी उभे राहिले, आज गरज आहे ती आपण या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधान म्हणून विराजमान करण्याची. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी राहून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करावे असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. शेवगाव येथे एडीप या केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आयोजित दिव्यांग विनामूल्य सहायक उपकरण वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.  

या कार्यक्रमास आ. मोनिका ताई राजळे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले माजी जि.प.सदस्य नितीनराव काकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशाच्या उज्वल भविष्याकरिता श्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करावयाचे आहे आज दिव्यांगांना जे सहाय्यक उपकरण आपण वाटप करत आहोत याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगाच्या उज्वल भविष्याचा विचार करून त्यांचे जीवन आनंदमय व्हावे याकरिता हे साहित्य विनामूल्य दिले आहे. 25 ते 50 हजार रुपयांचे हे सहाय्यक उपकरण विनामूल्य आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवले आहे. हे साहित्य देण्यासाठी आपल्याला कोणाच्याही शिफारशीची गरज पडली नाही हे विशेष असल्याचे सांगून या साहित्य वाटपातून कुठलाही मोबदल्याची अपेक्षा यातून नसून केवळ पुण्य कमविण्यासाठी आम्ही सर्वजण हे काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एका मुलाचे कर्तव्य आम्ही पार पडले असून मतांसाठी हे केले नाही असे सांगताना विखे म्हणाले की आमच्या कुटुंबाने वैचारिक राजकारण केले आहे. तोच वसा आणि वारसा आपण पुढे चालवत आहोत. कायम समाजाचा विकास हेच ध्येय आपण घेवून काम करत असून शेवगावच्या रस्ता डांबरीकरणासाठी साडे तीनशे कोटी रुपयाचा निधी आणला असून लवकरच हे काम पूर्ण होईल असे सांगितले.

प्रारंभी दिव्यांग बंधू-भगिनींना सहाय्यक उपकरणाचे वाटप खा.डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिकाताई राजळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आरोग्य दूत यांनी दिव्यांग यांच्या नोंदणीसाठी तसेच तपासणीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग बंधू भगिनी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!