श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- ग्राहक चळवळीचे जनक ग्राहक तिर्थ बिंदू माधव जोशी यांचे नावाने ग्राहक हिताचे विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासनाने पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी तालुका ग्राहक पंचायतीच्या बैठकीत करण्यात आली ग्राहक पंचायतीची बैठक सी डी जैन काँलेज येथे आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत सर्वानुमते ही मागणी करण्यात आली.
ग्राहक पंचायतीचे संस्थापक ग्राहक तीर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या जयंती निमीत्ताने सी. डी. जैन कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. बाळासाहेब बावके यांचे हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली या बैठकीचे अध्यक्षस्थानी तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. गोरख बारहाते हे होते.
या बैठकीत ग्राहक पंचायतीचे संस्थापक ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या नावाने दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो याच दिवशी बिंदु माधव जोशी यांचे स्मरणार्थ ग्राहक चळवळीत कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवुन सन्मान करण्यात यावा जेणेकरुन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल.असा विश्वास चळवळीत काम करणारांनी व्यक्त केला या वेळी आलेल्या चर्चेत सर्वश्री कमल मुंदडा, प्रा. योगीराज चंद्राते, सचिन चंदन, भरत बाठीया, किशोर कुलकर्णी, दत्तात्रय गवळी, चंद्रकांत कुलकर्णी आदींनी भाग घेतला.
या वेळी झालेल्या चर्चेत देशात ग्राहक संरक्षण कायदा केंद्र सरकारचे वतीने तयार करण्याचे दृष्टीने ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी संघटना तयार करुन सन १९७४ मध्ये पुणे येथे ग्राहक पंचायतीची स्थापना केली तर २४ डिसेंबर १९८६ रोजी संसदेमध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत झाला. त्याचाच एक भाग म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांनी त्यांचेवर महाराष्ट्र शासन ग्राहक कल्याण उच्याधिकार समितीचे अध्यक्षपद देवून त्यांना कॅबीनेट पदाचा दर्जा दिला होता .त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली यावेळी ग्राहक चळवळ वाढविण्याबाबत व ग्राहकामध्ये जागृती आणण्या बाबत काय उपाय योजना केल्या पाहीजे त्याची माहीती ग्राहक पंचायत नासिक विभागाचे उपाध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री यांना निवेदन देण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले,या वेळी लवकरच ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ.गोरख बारहाते यांनी सांगीतले.प्रास्ताविक दत्तात्रय काशिद यांनी केले तर किरण घोलाप यांनी आभार मानले




