spot_img
spot_img

महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे जीवन कार्य प्रेरणादायी; – माजी आ.मुरकुटे

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – महात्मा गांधी यांचे अहिंसा, शांती व बंधुत्व या तत्त्वाची देशाला आजच्या परिस्थितीत गरज आहे. महात्मा गांधी यांनी देशाला सत्याग्रह, चळवळ आणि जनआंदोलनाची मोठी देणगी दिलेली आहे. याप्रमाणेच दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन जवान आणि शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित केले. या दोघांचेही जीवन देशासाठी समर्पित होते. त्यांचे स्मरण देशाच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

भारत राष्ट्र समितीच्या वतीने महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त माजी आ.श्री.मुरकुटे यांच्या हस्ते महात्मा गांधी पुतळ्यास तसेच स्व.लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भारत राष्ट्र समितीचे शहराध्यक्ष नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, अशोक बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी, संचालक ॲड्.उमेश लटमाळे, कारेगाव भाग कंपनीचे संचालक भगवान सोनवणे, नारायणराव बडाख, रोहन डावखर, अमोल कोलते, संदीप डावखर, पुंडलीकराव खरे, शरीफ मेमन, कैलास भागवत, विशाल धनवटे, संकेत संचेती, ज्ञानदेव वर्पे, लालाशेठ देवी, प्रमोद करंडे, रोहित करंडे, संजय मोरगे, पंकज देवकर, सोहम मुळे आदी उपस्थित होते.

तसेच अशोक कारखाना कार्यस्थळावर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अशोक कामगार पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, प्रमोद बिडगर, कृष्णकांत सोनटक्के, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, कारेगाव भाग कंपनीचे मॅनेजर ज्ञानेश्वर बडाख, विलास लबडे आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!