श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने प्रा. ज्ञानेश गवले यांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.
प्रा. ज्ञानेश गवले हे गत तेहतीस वर्षांपासून ते छपाई व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमात कार्यरत असुन गत तेरा वर्षांपासून ते दूरदर्शन, नवी दिल्ली या शासकीय वृत वाहिनीचे नगर जिल्हा प्रतिनिधी आहेत.विविध शासकीय उपक्रम व समाज प्रबोधन विषयक प्रसार माध्यमातील सक्रिय सहभाग आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित “स्वच्छ्ता ही सेवा” पंधरवाड्यातील विशेष सहभाग तसेच प्रसार माध्यमातील त्यांच्या नेहमीच्या उत्स्फूर्त कार्याची दखल घेऊन त्यांना काल सन्मानित करण्यात आले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रसार अधिकारी माधव जायभाय व त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांच्या हस्ते प्रा. गवले यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, पुणे येथील अधिकारी हर्षल आकोडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रविंद्र ठाकुर, सहाय्यक अधिकारी फनिकुमार, तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, डॉ. बाळासाहेब कोलते आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सन्मानाबद्दल प्रा.गवले यांचे अनेकांनी कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



