spot_img
spot_img

दोन महिन्यांचा ‘राजकीय ब्रेक’ घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करा; पंकजा मुंडे यांना दिल्लीतून आदेश

 बीड (जनता आवाज वृत्तसेवा):- पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती आहे.राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच मध्य प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडेंना हे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपण राजकारणातून दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचं घोषित केलं होतं. ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे या नाराज झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी राजकारणातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता दिल्लीतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले आहेत. 
सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 
गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी पद्धतशीरपणे डावलल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. नंतर झालेल्या विधानपरिषदेमध्येही पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नव्हतं. 
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफरही दिली होती. तसेच काँग्रेसमधूनही पंकजा मुंडे यांना खुली ऑफर देण्यात आली होती. पण आपण कुठेही जाणार नाही, आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही त्या वेगळी भूमिका घेणार असल्याच्या अफवा सातत्याने उठत होत्या
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!