spot_img
spot_img

स्वच्छता पंधरवडा मोहीमे अंतर्गत श्रीरामपूर नगर परिषदवतीने आयोजन

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :-श्रीरामपूर नगर परिषद आयोजित १ ऑक्टोबर रोजी स्वच्छता पंधरवडा मोहीम मेनरोड येथे महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छ अभियानास मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यात स्‍वच्‍छतासफाई कर्मचााऱ्यासह शहरातील शाळेतील विदयार्थीसह,एन.सी.सी., स्‍कॉउट गाईड, एनजीओ, विविध कार्यालय पदाधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, सहविविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरवासियांना अभियानात चांगल्या प्रकारे सहभागी झाले होते.

अभियान प्रारंभी मुख्यधिकारी गणेश शिंदे म्हणाले, देशाचे महात्मा महात्मा गांधी यांनी नेहमी स्वच्छतेला महत्त्व दिले. आता देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यास प्राधान्य दिलेले आहे. आपला परिसर ,प्रभाग, रस्ता, स्वच्छ ठेवला तर आपले शहर ही स्वच्छ राहील

मेनरोड येथे अभियानात ज्ञान धारा पतसंस्थेचे कर्मचारी व दिनदयाळ अंतोदय संस्थेचे अध्यक्ष व नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी,विद्यार्थिनी ह्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.तसेच लोकमान्य टिळक वाचनालयाच्या अभ्यासिका विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

मुख्याधिकारी गणेश शिंदे , ग्रंथपाल स्वाती पुरे , मंगल रेड्डी,शहर समन्वयक प्रमोद चव्हाण, , काचंन चावरे,सायली दरंदले, रुक्मिणी क्षत्रिय,सुमन रायकर,संगिता रासकर,राजू बोरकर, सिध्दार्थ गवारे, स्वप्निल माळवे, सुर्यभान सातदिवे, राजेश जेधे,विजय झिंगारे,दिपक व्यवहारे,मुकादम संदिप राऊत,व आरोग्य कर्मचारी वृंद यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

या स्‍वच्‍छता पंधरवडा – स्‍वच्‍छता हि सेवा उपक्रामचे शहरातील विविध परिसरात अभियान राबविण्यात आले . त्यात प्रामुख्याने उपमुख्याधिकारी धनंजय कविटकर यांनी नवीन प्रशासकीय इमारत, श्रीरामपूर कोर्ट (न्यायालय), मिनी स्टेडीयम परिसर केला तर ग्रथपाल स्वाती पुरे यांनी मेनरोड परिसर केला .

मनोजकुमार ईश्वरकट्टी , नगरपरिषद दवाखाना रोड, नगरपरिषद कार्यालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज रोड केला. तर महेश प. कवटे व श्रीमती जयश्री सायखेडे यांनी सैलानी बाबा पूल, पुणतांबा रोड केले.

राम सरगर व अनंत शेळके यांनी दहावा ओट्टा, संगमनेररोड परिसर केले तर पुरण धांडे यांनी सोमैय्या हायस्कूल रोड, जिजामाता चौक केले तर अमोल साळुंखे म्हाडा कॉलनी केली तर सचिन जोगदंड व कु.शीतल काळे यांनी नॉर्दन ब्रँच ते अक्षय कॉर्नर जॉगिंग टड्ढॅक गजानन वसाहत परिसर केले तर श्रीमती.अर्चना पाठे यांनी श्रीराम मंदिर परिसर केले तर गुजर व त्रिभुवन गुरुनानकनगर यांनी तर धनश्री पाटील थत्ते मैदान तर सौ.रेखा चाटे बाजारतळ हेमंत कार्ले यांनी अक्षय कॉर्नर ते लव्ह श्रीरामपूर जॉगिंग परिसर केला तर संजय शेळके यांनी बालिका हायस्कूल तर रावसाहेब घायवट यांनी बस स्टॅन्ड रोड परिसर स्वच्छता अभियांन राबविण्यात आला आहे.

स्वच्छता ही सेवा – २०२३ अभियाना शहरातील सात वार्डात तेवीस ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आल्याचे माहिती श्रीरामपूर नगरपरिषदेचे प्रशासक किरण सावंत पाटील आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!